image-call
image-whatsapp

धरणगुत्ती हायस्कूल, धरणगुत्ती Dharangutti High School, Dharangutti – Quality Education for Bright Future

धरणगुत्ती हायस्कूल, धरणगुत्ती (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ही 1997 साली स्थापन झालेली, मराठी माध्यमाची शासनमान्य व 100% अनुदानित माध्यमिक शाळा आहे. शाळेत इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेची स्थापना करण्यात आली असून शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि नैतिक मूल्ये यांना येथे विशेष महत्त्व दिले जाते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी शाळेत अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग कार्यरत असून आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर केला जातो. शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रमांवरही भर दिला जातो. सुरक्षित व पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करण्यास सक्षम करणे हेच शाळेचे प्रमुख ध्येय आहे.

पुढे वाचा
about-us

हायस्कूल दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधा

  • आनंददायी व दर्जेदार शिक्षण व्यवस्था

  • तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग

  • इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंत मराठी माध्यमाची सोय

  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी डिजिटल वर्गखोल्या

  • सहशालेय उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा

  • वायफाय कॅम्पस ची सोय

  • ई-लर्निंगद्वारे अध्ययन व पालकांशी सतत संपर्क

  • स्वतंत्र संगणक कक्ष व संगणक शिक्षण

  • सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा

  • क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन

  • संगीत शिक्षणाची स्वतंत्र सोय

  • मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय

  • शासन पुरस्कृत सर्व शासकीय योजनांचा लाभ

  • स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यश

  • पालकांसाठी विविध मार्गदर्शन उपक्रम

  • मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर

  • मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी शाळेच्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय

आम्हाला का निवडाल ?

धरणगुत्ती हायस्कूलमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण दिले जाते.

या शाळेचे शिक्षण माध्यम पूर्णपणे मराठी आहे.

होय, धरणगुत्ती हायस्कूल ही शासनमान्य व 100% अनुदानित माध्यमिक शाळा आहे.

शाळा संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती या संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते.

होय, शाळेत अनुभवी, प्रशिक्षित व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असा शिक्षकवर्ग कार्यरत आहे.
शाळेतील वर्गवारी व विद्यार्थी संख्या:
इयत्ता विद्यार्थी
8 वी 57
9 वी 49
10 वी 52
एकूण 158

शालेय उपक्रम

gallery
वृक्षारोपण उपक्रम – पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपत विद्यार्थी
gallery
योग दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग.
gallery
अद्यावत संगणक कक्ष – डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी.
gallery
भव्य कॉन्फरन्स व प्रोजेक्टर हॉल – आधुनिक अध्यापनाची सुविधा.
gallery
किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम
gallery
तंबाखूमुक्त जनजागृती अभियान – आरोग्यदायी जीवनाचा संदेश.
gallery
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ – गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
gallery
स्नेहभोजन कार्यक्रम – विद्यार्थी शिक्षकांमधील आपुलकीचे नाते.

आमच्याशी संपर्क करा

धरणगुत्ती हायस्कूल, धरणगुत्ती

विभूते हायस्कूल, नांदणी नाका, बायपास रोड, धरणगुत्ती, जयसिंगपूर – ४१६१०२.

आम्हाला कॉल करा

+91 9370694075

आम्हाला मेल करा

dhdschool@gmail.com

प्रवेश माहिती फॉर्म

आपल्या मुलाला उज्ज्वल भविष्यासाठी नोंदणीसाठी आजच चौकशी करा..!